शासन निर्णय :
१) युटीए-१०९५/प्र.क्र-१६९/मावक-२. दिनांक २४ सप्टेंबर १९९७
२) युटीए-१०१३/प्र.क्र.२५९/सामासु. दि २१ ऑगस्ट २०१३
३) युटीए-१०१६/प्र.क्र.२९८ / साभासु. दि. २३ डीसेंबर २०१६
योजनेचे उद्दिष्ट :
जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती /जमाती व्यक्तींना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे.
लाभाचे स्वरूप :
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटुंबावर / व्यक्तींवर अत्याच घडल्यास, सदर गुन्ह्यांची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनीयम १९५५ खाली / अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास गुन्ह्याच्य स्वरूपावरून रु. १ लाख ते ८.२५ लाखापर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे :
1.योजनेच्या लाभासाठी व जातीच्या दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.