उद्दिष्ट :
सहकार व वस्त्रोद्योग विभागाने पुरस्कृत केलेल्या मागासवर्गीयांच्या सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्याबाबतची योजना राज्यात कार्यान्वित आहे.
अटी व शर्ती :
प्रकल्प मूल्य महत्तम रु.61 कोटी. प्रकल्प किंमतीच्या 5% आणि किमान रु. 80 लाखापर्यंत सभासद भाग भांडवल गोळा केल्यानंतर सदर सुतगिरणी कर्जास पात्र होते.
वित्तीय सहाय्याचे सूत्र :
- सभासद भागभांडवल-5% (किमान रु.80 लाख)
- सहकार व वस्त्र उद्योग विभागाकडून भागभांडवल -45%
- सामाजिक न्याय विभागाकडून दीर्घ मुदतीचे कर्ज-50%
- प्रकल्प किंमतीच्या 90% रक्कम सूत गिरणींना अदा केल्यानंतर 2 वर्षानी कर्ज वसूली सुरु करण्यात येते.
- कर्जाची परतफेड 6 वर्षाच्या कालावधीत एकूण 24 समान त्रैमासिक हप्त्यात करण्यात येते.
सुतगिणींचे नाव :
संपर्क :
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,