सैनिक शाळेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता

1.शासन निर्णय क्रमांक :
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: इबीसी-2003/प्र. क्र.184/मावक- 2 दिनांक 17 सप्टेंबर 2003

2.योजनेचा उदेश व योजने इतर माहिती :
मागासवर्गीय विद्यार्थ्याना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण विद्यार्थीदशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी रु.15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.

3.योजनेत देण्यात येणारे लाभ :
प्रती महिना रु.1500/- प्रमाणे 10 महिन्याचे प्रती विदयार्थ्यांना वार्षाीक 15000/- रुपये देण्यात येते.

4.योजनेच्या लाभाथी निवडीचे निकष:
1. विदयार्थी अनु. जाती या प्रवर्गाचा असावा.
2. विदयार्थी हा शासकीय / अनुदानित सैनिक शाळेत शिकणारा असावा.
3. विदयार्थ्याच्या पालकाचे उत्पन हे रु.2,50000/- पेक्षा कमी असावे.
4. विदयार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
5. विदयार्थी ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्षाची उपस्थिती ही 60% असावी.

5.आवश्यक कागदपत्रे :
1. जातीचे प्रमाणपत्र (अनु. जाती).
2. उत्पन्न प्रमाणपत्र (रु.2,50,000/-).
3. रहिवाशी प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य).

6.सन 2025-26 या चालु वर्षातील योजनेची सदयास्थिती :
सन 2025-26 पासुन सदर योजना महाडीबीटी प्री मॅट्रीक या ऑनलाईन पोर्टलवर कार्यान्वीत करण्यात आली असुन ऑनलाईन एकुण 45 अर्ज प्राप्त झालेले आहे. सदर अर्जाची तपासणी करण्यात येवुन विदयार्थ्यांना लाभ देण्याची प्रकीय सुरु आहे.

7.सन 2022-23 ,2023-24, 2024-25 या मागील तीन वर्षाची स्थिती:
3 वर्षात दिलेला लाभ

अ.क्र.  वर्ष एकुण विदयार्थी संख्या लाभ दिलेली रक्कम रु.
1 2022-23 27 4,05,000/-
2 2023-24 147 22,05,000/-
3 2024-25 58 8,70,000/-