राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार

Scholarship Image

1.योजनेचा उददेश व योजनेची माहीती :

शासन निर्णय –शासन निर्णय क्रमांक –इबीसी -2003/प्र्. क्र्. 115 /मावक 2, दिनांक 21 जुलै 2003 अन्वये
अनुसुचित जातीच्या विद्यार्थाना इयता 10 वी व 12वी च्या परीक्षेत विशेष उललेखनिय यश संपादन करणा-या विदयार्थाना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे.

2.योजनेत देण्यात येणारे लाभ :

अ.क्र. योजना रोख रक्कम व प्रमाणपत्र्
1 सर्वसाधारण विद्यार्थामधुन प्रत्येक विभागीय बोर्डाच्या  गुणवत्ता यादीमध्ये  आलेल्या प्रत्येक अनुसुचित जाती,प्रवर्गाच्या विद्यार्थास रु.50 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र्
2 सर्वसाधारण  विद्यार्थामधुन  जिल्हात प्रथम आलेल्या अनुसुचित जाती,प्रवर्गाच्या विद्यार्थास रु.25 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र्
3 सर्वसाधारण  विद्यार्थामधुन  तालुक्यात प्रथम आलेल्या अनुसुचित जाती,प्रवर्गाच्या विद्यार्थास रु.10 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र्
4 सर्वसाधारण  विद्यार्थामधुन  प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधुन ई 10वी व 12वी परीक्षेत प्रथ्म आलेल्या अनुसुचित जाती,प्रवर्गाच्या विद्यार्थास रु.5 हजार रोख स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र्

 

3.योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष :

विद्यार्थि अनुसुचित जातीचा असावा व त्याचे बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये नांव असावे तसेच ईयत्ता 10 वी व 12वी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थामधुन प्रथम आलेला असावा.

4.आवश्यक कागदपत्रे :

    • बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये नांव
    • मार्कशिट 
    • टिसी
    • जातीचे प्रमाणपत्र

5.सन 2025-26 या चालु वर्षातील योजनेची सद्य स्थिती :
सन 2025-26 मध्ये 60 विद्यार्थाना एकुण रु. 320000 गुणवता पुरस्काराचा लाभ दिला.

6.सन 2022-23 ,2023-24, 2024-25 या मागील तीन वर्षाची स्थिती :

अ.क्र.

वर्ष

एकुण लाभार्थि संख्या

लाभ दिलेली रक्कम रु.

1

2022-23 54

270000/-

2

2023-24 33

165000/-

3

2024-25 36

180000/-