
योजनेचे शासन निर्णय :-
1) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासन निर्णय क्रमांक:
बीसीएएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2
दिनांक : 26 डिसेंबर, 2024
2) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासन निर्णय क्रमांक:
बीसीएएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2
दिनांक : 13 ऑगष्ट, 2025 (सुधारणा)
3) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासन निर्णय क्रमांक:
बीसीएएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2
दिनांक : 15 ऑक्टोंबर, 2025 (सुधारणा)
योजनेचा उद्देश व योजनेची इतर माहिती
शासकीय वस्तीगृहात सर्वच विद्यार्थ्यांना वस्तीगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शासकीय वस्तीगृह प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागल्याने त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मर्यादा येतात.
करीता अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता दिनांक 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी केल्या जाते.
योजनेत देण्यात येणारे लाभ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत देय रक्कम खालील प्रमाणे आहे.
| अ. क्र. | खर्चाची बाब | जिल्हयाच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका / नगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि..मी. परीसरात असलेली महाविद्यालय / शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम | तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम |
| १ | भोजन भत्ता | रू.२५,०००/- | रू.23,000/- |
| २ | निवास भत्ता | रू.१२,०००/- | रू.10,000/- |
| ३ | निर्वाह भत्ता | रू.६,०००/- | रू.5,000/- |
|
प्रती विद्यार्थी एकुण देय रक्कम (दोन सत्र, 10 महिन्यासाठी ) |
रू.४३,०००/- | रू.38,000/- | |
वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष
रु. 5,000/- व इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी
रु. 2,000/- शैक्षणिक साहित्याकरिता ठोक स्वरूपात देण्यात येईल.
योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष
अ) मुलभूत पात्रता
- विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. महाराष्ट्राचा रहीवास पुरावा (वय / अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र) DOMICILE प्राधिकृत अधिकाऱ्याव्दारे निर्गमित केलेला असावा. विद्यार्थ्यांचे स्वत:चे आधार कार्ड क्रमांक असणे अनिवार्य राहील.)
- शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा.
- विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तथापि, सदर अट ही ज्या महानगर / शहरांमध्ये वसतीगृहांची संख्या एका पेक्षा अधिक असल्यास त्या महानगर / शहरांमधील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेवून वसतीगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील, त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरीत पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
- शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन प्रणालीत अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांने अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील.
- विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.(आधार सीडिंग स्लीप सोबत जोडणे आवश्यक राहील )
- विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या / तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
- विदयार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या-ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील. सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले सन 2024-25 मधील(31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेले) वडीलांचे/ पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (2.50 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले) त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेले विद्यार्थी नियमानुार अपात्र होतील.विदयार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
- साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतीगृह प्रवेश प्रक्रीया सुरू होते, त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी https://hmas.mahait.org या वेबसाईटवर नोदणी करुन लॉगीन करावे. युजर आयडी व पासवर्ड विद्यार्थ्यांने जतन (सेव्ह) करुन ठेवावा. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया उशीरा होईल, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल.
- विद्यार्थ्यास शासकीय वसतीगृहात मिळालेला प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतीगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही
- शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतीगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र ठरलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमेच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
प्रथम वर्ष प्रवेशाकरीता (11 वी व उच्च शिक्षणातील प्रथम वर्ष ) अर्ज करतेवेळी विद्यार्थ्यांने सर्वप्रथम शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेत भाग घेतल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहील.(विद्यार्थ्यांनीं ज्या वसतिगृहात अर्ज केलेला असेल तेथील गृहपाल यांचे प्रमाणपत्र अर्जा सेाबत सादर करणे आवश्यक राहील)सन 2025-26 या वर्षा करिता समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेची अंतीम तारीख खालील प्रमाणे होती.
बिगरव्यवसाईक महाविद्यालयासाठी दि.23 जुलै 2025 ही तर
व्यवसायिक महाविद्यालयासाठी दि.30 सप्टेंबर 2025 ही होती.
परंतु प्रथम वर्ष प्रवेशाकरिता ज्या ठिकाणी शासकीय वसतीगृह उपलब्ध नाही अशा ठिकाणच्या (शहराच्या) महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला असेल तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांने शासकीय वसतीगृहाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतल्या बाबतचा पुरावा अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहणार नाही.( तथापी विद्यार्थ्यांने मध्यंतरीच्या वर्गात असतांना (उदा. 2nd, 3rd व 4th) स्वाधार येाजनेकरिता थेट ऑनलाईन अर्ज केल्यास वसतीगृह प्रवेश प्रक्रियेत भाग घेतल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहणार नाही.)परंतु प्रथम वर्ष प्रवेशाकरिता जेथे शासकीय वसतीगृह उपलब्ध नाही अशा ठिकाणच्या (शहराच्या) महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला असेल तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांने शासकीय वसतीगृहाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतल्या बाबतचा पुरावा अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहणार नाही.सदर विद्यार्थी थेट स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज भरु शकतील.
- सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.
ब) शैक्षणिक निकष
- सदर विद्यार्थी इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
- विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविदयालय/शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने, प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते
महाविदयालय / शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका / नगर पालिका / नगरपंचायत / ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहेत त्या महानगर पालिका/ नगर पालिका /नगरपंचायत / ग्रामपंचायत अशा ठिकाणचा रहीवासी नसावा.) - जिल्हयाच्या ठिकाणी महानगर पालिकेच्या / नगर पालिकेच्या हद्दीपासुन ०५ कि. मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात / शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
परंतु
तालुक्याच्या ठिकाणी मात्र नगरपालिका / नगरपंचायतीच्या हद्दीतील असलेल्या महाविद्यालयात / शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीच या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. - स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान ५० टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन / SGPA/ CGPA ईत्यादी टक्केवारीत रुपांतरीत असणे अनिवार्य राहील.त्यापूर्वीच्या इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्याची आवश्यकता राहणार नाही परंतु यापूर्वी शिक्षण घेतलेल्या सर्व शैक्षणिक वर्षाच्या पास व फेल झाल्याच्या गुणपत्रिका (Marksheet) अर्जासोबत ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करणे तथा अर्जाच्या हार्ड कॉपी सोबत कार्यालयास सादर करणे बंधणकारक राहील.
( विशेषत: पहिल्यांदा / प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी) महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट व ॲडमिशन स्लीप ची झेरॉक्स प्रत जेाडणे बंधनकारक राहील. ज्या व्यवसायिक (Professional) अभ्यासक्रमाच्या ॲडमिशन CAP Certificate व्दारे होतात. त्यांना CAP Certificate अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. - एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
- इयत्ता १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी हा 2 वर्षापेक्षा कमी नसावा.
(संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.) - शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र ठरतो. शासकीय वसतीगृह प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देता येत नाही. तथापि, विद्यार्थ्याने स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरीता लाभ देता येईल.
- व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (पदवी / पदव्युत्तर) प्रवेश घेतला असल्यास स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. (उदा. अभियांत्रिकेच्या पदवी- बी.ई. नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यास स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.)
- बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुज्ञेय राहील. (उदा. बी.ए. नंतर एल.एल.बी.,बी.ए.नंतर बी.एड, बी. कॉम. नंतर एम.बी.ए.)
- या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांना ३% आरक्षण असेल. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे UDID कार्ड जोडाणे अनिवार्य आहे. दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यासाठी गुणवत्तेची टक्केवारी ४०% इतकी राहील, त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
- स्वाधार योजनेंतर्गत महिलांसाठी ३०% समांतर आरक्षण किवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील.
- स्वाधार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र होईल. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्याक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील
- या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही.
क) इतर निकष
- सदर योजनेचा लाभ इयत्ता १० वी नंतरचे अनुक्रमे ७ शैक्षणिक वर्ष उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस अनुज्ञेय राहील, तथापि, उपरोक्त ०७ वर्षांचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल (बिगरव्यसायिक).व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त अनुक्रमे ८ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. याकरीता विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा
३० वर्षे इतकी राहील. - स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पदवी / पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटीकेटी (ATKT) प्राप्त झाली असेल त्या विद्यार्थ्यांला फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल. (म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यास दुसऱ्यावेळेस एटीकेटी (ATKT)मिळाल्यास तो विद्यार्थी सदर योजनेचा पुढील लाभ घेण्यास अपात्र असेल.
- अभ्यासक्रमाच्या मध्यावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभास पात्र राहील.
- शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र असेल. तथापि, शिक्षणातील खंड हा २ वर्षापेक्षा जास्त असू नये, जर खंड / गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.(नियमानुसार शिक्षणात 2 वर्षापेक्षा जास्त खंड असल्यास सदर विद्यार्थी योजनेसाठी अपात्र राहील.)
योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा (३० वर्ष) अर्जदार अधिक वयाचा नसावा.लगतच्या मागील शैक्षणिक अभ्यासक्रमाचा शाळा सोडण्याचा दाखला ( TC ) अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.
- विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा व्यावसायिक
पाठ्यक्रमाशी सलंग्न असणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना या तीन योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. जर एकच विद्यार्थी एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ एकाच कालावधीत घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील व लाभार्थी विद्यार्थ्याने जो आर्थिक लाभ घेतला आहे ती रक्कम १२ % व्याजासह वसूल करण्यात येईल. - सदर कालावधीत विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
- विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परिक्षेचा निकाल लागल्यावर १५ दिवसांचे आत प्राचार्या मार्फत कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी/व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व सदर योजनेंतर्गत दिलेल्या लाभाच्या रक्कमेची १२% व्याजासह वसुली करण्यात येईल.
- सदर योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने द्यावयाची माहिती चे प्रपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे, त्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
यांच्याकडे त्या विदयार्थ्यांनी अर्जाची हार्ड कॉपी सादर करणे बंधनकारक राहील.परंतु त्या आधी अर्जदारानेhttps://hmas.mahait.org या वेबसाईटवर नोदणी करुन लॉगीन करावे व संपूर्ण माहितीसह अर्ज भरावा. - विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या महाविद्यालयात करण्यात येईल, त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांव्दारे प्रत्येक सत्रनिहाय (Semester) सादर केलेल्या महाविद्यालयीन उपस्थितीच्या आधारे संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे प्रत्येक सहामाहीस (सहा महिने) अनुज्ञेय रक्कम संबधित विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बैंक खात्यामध्ये जमा करतील.
- MAHADBT या ऑनलाईन पोर्टलवर भारत सरकार पोस्टमॅट्रिक स्कॉलरशिप चा अर्ज भरत असतांना
जे विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहतात त्यांनी Hosteller हा विकल्प निवडावा व जे विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी DayScholar हा विकल्प निवडावा.व याची खात्री महाविद्यालयाच्या प्रार्चाऱ्याव्दारे करण्यात यावी. - विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ % आवश्यक राहील, याबाबत महाविद्यालयाच्या
प्राचार्यांव्दारे उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त व वर्तणुक समाधानकारक असावी. - विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील.
- सदर योजनेचा लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच लागू राहील, अर्धवेळ अभ्यासक्रम, दुरस्थ व बहिस्थ
अभ्यासक्रम, नोकरीसह करण्यात येणारा Executive Course यासाठी सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. - या योजनेकरिता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात
आलेले आहे. - बँकेची माहिती (राष्ट्रीयकृत बॅकेचे खाते आधार सलंग्न असलेले)
खाते क्रमांकासोबत अधारलिंकींग बाबतचा पुराव (बॅकेचा शिक्का असलेली) सीडिंग स्लीप सोबत जोडणेMINOR (जे खाते वयाच्या 10 वर्षा अगोदर काढण्यात आलेले आहे असे.) प्रकारचे बॅक खाते सदर योजनेकरीता ग्राहय धरल्या जाणार नाही.JOINT /संयुक्त खाते सदर योजनेकरीता ग्राहय धरल्या जाणार नाही.IPPBS पोष्टाचे खाते सदर योजनेकरीता जोडण्यात येवु नये.
(सदर खात्यात VPDA प्रणालीव्दारे बऱ्याचदा रक्कम जमा होत नसल्याकारणाने.)- विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव :-
• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :-
• शाखा :-
• खातेक्रमांक :-
• IFSC code :-
(असल्यास विद्यार्थ्यांने स्वत:च्या पॅन कार्ड ची झेरॉक्स प्रत हार्ड कॉपी अर्जासोबत जोडावी)
- विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव :-
घेत असतील तरी त्यांनी पोर्टलवर नवीन (New) सन 2025-26 असे सिलेक्ट करुन अर्ज करावा.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर मागील वर्षी अर्ज केला होता व ज्यांनी आता पुढील वर्षात प्रवेश
घेतला आहे.अशा विद्यार्थ्यांनी विद्यमान (Existing) असे सिलेक्ट करुन अर्ज करावा.
ड) अनुदान वितरण :-
इ) या व्यातिरीक्त योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- आवश्यक कागदपत्रे, :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याकरीताhttps://hmas.mahait.org या वेबसाईटवर नोदणी करुन लॉगीन करावे. व युजर आयडी व पासवर्ड विद्यार्थ्यांने जतन (सेव्ह) करुन ठेवावा.
वरील नमुद पोर्टलवर परीपूर्ण माहिती भरल्यावर खालील नमुद मुळ कागदपत्रे अनुक्रमानुसार अपलोड करावी.
- विद्यार्थ्याने स्वत:चे मुळ जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक राहील. (upload -1)
2)अ) विद्यार्थ्यांने स्वत:चे मुळ अधिवास प्रमाणपत्र (डोमॅसाईल) अपलोड करणे आवश्यक राहील.
ब) विद्यार्थ्यांने स्वत:चे मुळ आधार कार्ड ची प्रत सेाबत अपलोड करणे आवश्यक राहील.
(upload – 2 ‘अ’ व ‘ब’)
- मुळ उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न
प्रमाणपत्र सन 2024-25 चे( upload – 3)
(वडीलांचे / कुटूंबाचे एकत्रीत रु 2.50 लक्ष च्या आतील)
(सन 31 मार्च 2026 पर्यंत वैध असलेले ) अपलोड करणे आवश्यक राहील.
जर उत्पन्न प्रमाणपत्र आईच्या नावाचे असेल तर वडीलांचे मृत्यु प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक राहील.
तसेच घटस्पोट झाला असल्यास त्या संबधी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील.
जर विदयार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र अपलोड करणे
आवश्यक राहील.
- गुणपत्रिका (मार्कशिट) (इयत्ता 10 वी नंतरच्या सर्व मार्कशिट) व शाळा सोडण्याचा दाखला (T.C)
शेवटची सर्व शैक्षणिक वर्षाच्या पास व फेल झाल्याच्या मुळ गुणपत्रिका (Marksheet) अपलोड करणे
आवश्यक राहील( upload – 4)
5) विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाचे मुळ बोनाफाईड सर्टिफिकेट व मुळ ॲडमिशन स्लीप
अपलोड करणे आवश्यक राहील. (upload-5)
6)आवश्यकता असल्यास अंतर / गॅप प्रमाणपत्र (शिक्षणात खंड पडला असल्यास जास्तीत जास्त 02 वर्ष
पर्यंतची गॅप) अपलोड करावे. (upload-6)
(जर विद्यार्थी रुम करुन किरायाने / भाडयाने राहात असल्यास खाली नमुद केल्या प्रमाणे कार्यवाही करावी.)
7)विद्यार्थ्याकडुन घ्यावयाचे घोषणापत्र. (upload-7 अ )
अ) प्रपत्र ‘अ’ स्वयंघोषणापत्र, प्रपत्र ‘ब’ स्वयं-साक्षांकनासाठी स्वयंघोषणापत्र
(कार्यालयाव्दारे उपलब्ध करुन दिल्या नुसार )
किंवा
( जर विद्यार्थी खाजगी वसतिगृहात राहात असल्यास खाली नमुद केल्या प्रमाणे कार्यवाही करावी.)
7)विद्यार्थ्याकडुन घ्यावयाचे घोषणापत्र(upload-7 ‘अ’ व ‘ब’ )
अ) प्रपत्र ‘अ’ स्वयंघोषणापत्र, प्रपत्र ‘ब’ स्वयं-साक्षांकनासाठी स्वयंघोषणापत्र
(कार्यालयाव्दारे उपलब्ध करुन दिलेल्या नमुण्या नुसार)
ब) खाजगी वसतिगृहात राहात असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत वसतिगृहाचे गृहपाल / अधिक्षक यांचे व्दारे प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र
(कार्यालयाव्दारे उपलब्ध करुन दिलेल्या नमुण्या नुसार )
8)पालकाकडुन घोषणापत्र (फक्त वसतिगृहात राहणऱ्या विद्यार्थ्यांकरिता लागु राहील ) (upload – 8 )
जर विद्यार्थी रुम करुन किरायाने / भाडयाने राहात असल्यास खाली नमुद केल्या प्रमाणे कार्यवाही कराव
9)भाडे करार(upload – 9 अ, ब, क व ड )
अ) भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत कार्यालयाव्दारे उपलब्ध करुन दिलेले नमुना प्रतिज्ञापत्रा प्रमाणे (फक्त सदर प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले असणे बंधनकारक राहील)
कार्यालयाव्दारे विहीत नमुण्यात उपलब्ध करुन दिल्यानुसार मुळ भाडे करारनामा व भाडेचिठठी अपलोड करणे आवश्यक राहील.
ब)घरमालकाचे घराची टॅक्स पावती किंवा विद्युत बिलाची मुळ प्रत अपलोड करणे आवश्यक राहील.
टॅक्स पावती व विद्युत देयक करारनामा करुन देणाऱ्या व्यक्तीच्या नावाची असणे बंधणकारक राहील.तसे नसल्यास संबधिताचे मृत्यु प्रमाणपत्र सोबत अपलोड करुन सोबत जोडावे )
- घरमालाकाचे मुळ आधार कार्डची प्रत अपलोड करणे आवश्यक राहील.
ड) सोबत रूमचा जिओग्राफिकल (GIS) लोकेशन असलेला फोटो किंवा DIGIPIN क्रमांक अपलोड करणे आवश्यक राहील.
किंवा
(जर विद्यार्थी खाजगी वसतिगृहात राहात असल्यास खाली नमुद केल्या प्रमाणे कार्यवाही करावी.)
9) (upload – 9 ‘अ’ व ‘ब’)
- वसतिगृह अधिक्षक / गृहपाल यांचे सदर विद्यार्थी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात खाजगी वसतिगृहात प्रवेश घेवुन शिकत असल्याचे मुळ बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत अपलोड करणे आवश्यक राहील.
ब) विद्यार्थ्यांने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात वसतिगृह प्रवेशाकरिता भरणा केलेल्या रकमेची मुळ पावती
(Receipt) सोबत अपलोड करणे आवश्यक राहील.
10) जिल्हयाच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या / नगरपालिकेच्या हद्दीपासुन महाविद्यालय 05 कि.मी.परिसरात येत असल्याचे महाविद्यालयाचे घोषणापत्र (upload – 10)
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या बाबातीत सदर महाविद्यालय हे नगरपालिका /
नगरपंचायतीच्या हद्दीतच असल्याचे महाविद्यालयाव्दारे दिलेले घोषणापत्र (upload – 10)
11) उपस्थिती प्रमाणपत्र (upload – 11)
(स्वाधार योजनेच्या प्रत्येक हप्त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ही 75% पेक्षा
जास्त असणे बंधनकारक आहे.)
(परंतु प्रणालीत अर्ज करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात प्रवेश झाल्यापासुन ते अर्ज
केल्याच्या अगोदरपर्यंत उपस्थिती अपलोड करणे गरजेचे राहील.)
टिप :- एकापेक्षा जास्त कागदपत्रे अपलोड करतेवेळी अपलोडींग फाईल ची साईज जास्त झाल्याने अपलोड होत
नसल्यास Pdf / File ला कॉम्परेस करुन अपलोड करावी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मुळ कागदपत्रे भाडयाने राहत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता
| अ.क्र. | अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे | प्राप्त | शेरा |
| 1 | स्वाधार योजनेचा अर्ज (ऑनलाईन अर्जाधी प्रीट) | ||
| 2 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी महाविद्यालयाद्वारे यावायचे माहितीचे प्रपत्र | ||
| 3 | जात प्रमाणपत्र (self Attested) | ||
| 4 | अधिवास प्रमाणपत्र (self Attested) | ||
| 5 | उत्पन्न प्रमाणपत्र (original) | ||
| 6 | गुणपत्रिका (मार्कशिट) | ||
| 7 | शाळा सोडण्याचा दाखला (T.C) | ||
| 8 | मुळ बोनाफाईड सर्टिफिकेट | ||
| 9 | शैक्षणिक अंतर (Gap Certificate) प्रमाणपत्र (असल्यास) | ||
| 10 | विद्यार्थ्यांकडुन घ्यावयाचे घोषणापत्र | ||
| 11 | मुळ भाडे करारनामा व भाडेचिठठी | ||
| 12 | भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचाबत (नोटरी) | ||
| 13 | (A) जिल्हाच्या मुख्यालयी असलेल्या महाविधालयच्या बाबतीत नगरपालीका हद्दीपासून 5 कि.मी. अंतर्गत येत असल्याचे महाविद्यालयाचे लेटर हेड वरती घोषणापत्र | ||
| 14 | उपस्थिती प्रमाणपत्र | ||
| 15 | राष्ट्रीयकृत बँकेचे खाते | ||
| 16 | आधार सीडिंग स्लीप | ||
| 17 | आधार कार्डची प्रत | ||
| 18 | रूमचा जिओग्राफिकल (GIS) लोकेशन असलेला फोटो किया DIGIPIN क्रमांक ची झेरॉक्स प्रत |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मुळ कागदपत्रे वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरीता
| अ.क्र. | अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे | प्राप्त | शेरा |
| 1 | स्वाधार योजनेचा अर्ज (ऑनलाईन अर्जाची प्रीट) | ||
| 2 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी महाविद्यालयाद्वारे यावायचे माहितीचे प्रपत्र | ||
| 3 | जात प्रमाणपत्र (self Attested) | ||
| 4 | अधिवास प्रमाणपत्र (self Attested) | ||
| 5 | उत्पन्न प्रमाणपत्र (original) | ||
| 6 | गुणपत्रिका (मार्कशिट) | ||
| 7 | शाळा सोडण्याचा दाखला (T.C) | ||
| 8 | मुळ बोनाफाईड सर्टिफिकेट | ||
| 9 | शैक्षणिक अंतर (Gap Certificate) प्रमाणपत्र (असल्यास) | ||
| 10 | विद्यार्थ्यांकडुन घ्यावयाचे घोषणापत्र | ||
| 11 | पालकाकडुन घ्यावयाचे घोषणापत्र (वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरीता) | ||
| 12 | वसतिगृह अधिक्षक / गृहपाल याचे सदर विद्यार्थी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात खाजगी वसतिगृहात प्रवेषा घेवुन शिकत असल्याचे मुळ बोनाफाईड प्रमाणपत्र वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरीता | ||
| 13 | खाजगी वसतीगृहात राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत (वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरीता) | ||
| 1 4 | वसतीगृहाची पावती | ||
| 15 | (A) जिल्हाच्या मुख्यालयी असलेल्या महाविद्यालयच्या बाबतीत नगरपालीका हद्दीपासून 5 कि.मी. अंतर्गत येत असल्याचे महाविद्यालयाचे लेटर हेड वरती घोषणापत्र | ||
| 16 | उपस्थिती प्रमाणपत्र | ||
| 17 | राष्ट्रीयकृत बँकेचे खाते | ||
| 18 | आधार सीडिंग स्लीप | ||
| 19 | आधार कार्डची प्रत | ||
| 20 | रूमचा जिओग्राफिकल (GIS) लोकेशन असलेला फोटो किया DIGIPIN क्रमांक ची झेरॉक्स प्रत |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मुळ कागदपत्रे
तालुकाच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाबाबत
| अ.क्र. | अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे | प्राप्त | शेरा |
| 1 | स्वाधार योजनेचा अर्ज (ऑनलाईन अर्जाधी प्रीट) | ||
| 2 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जासाठी महाविद्यालयाद्वारे यावायचे माहितीचे प्रपत्र | ||
| 3 | जात प्रमाणपत्र (self Attested) | ||
| 4 | अधिवास प्रमाणपत्र (self Attested) | ||
| 5 | उत्पन्न प्रमाणपत्र (original) | ||
| 6 | गुणपत्रिका (मार्कशिट) | ||
| 7 | शाळा सोडण्याचा दाखला (T.C) | ||
| 8 | मुळ बोनाफाईड सर्टिफिकेट | ||
| 9 | शैक्षणिक अंतर (Gap Certificate) प्रमाणपत्र (असल्यास) | ||
| 10 | विद्यार्थ्यांकडुन घ्यावयाचे घोषणापत्र | ||
| 11 | पालकाकडुन घ्यावयाचे घोषणापत्र (वसतीगृहात राहणा-या विद्याथ्यीकरीता) | ||
| 12 | मुळ भाडे करारनामा व भाडेचिठठी | ||
| 13 | भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचाबत (नोटरी) | ||
| 14 | (B) तालुकाच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या बाबतीत महाविद्यालय नगर परिषद / नगर पंचायत हदीत असल्याबाबतचे महाविद्यालयाचे लेटर हेड वरती घोषणापत्र | ||
| 15 | उपस्थिती प्रमाणपत्र | ||
| 16 | राष्ट्रीयकृत बँकेचे खाते | ||
| 17 | आधार सीडिंग स्लीप | ||
| 18 | आधार कार्डची प्रत | ||
| 19 | रूमचा जिओग्राफिकल (GIS) लोकेशन असलेला फोटो किया DIGIPIN क्रमांक ची झेरॉक्स प्रत |
7. सन 2022-23, 2023-24, 2024-25 या मागील तीन वर्षाची स्थिती
| अ.क्र. | वर्ष | एकूण पात्र विद्यार्थी संख्या | प्रत्यक्ष लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या | प्राप्त रक्कम | खर्ची झालेली रक्कम | शेरा |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2022-23 | 526 | 526 | 19435.000 | 19435.000 | |
| 2 | 2023-24 | 1315 | 1315 | 53448.000 | 53448.000 | |
| 3 | 2024-25 | 702 | 702 | 28187.500 | 28187.500 | |
| एकूण | 2543 | 2543 | 101070.500 | 101070.500 | ||
8. सन 2025-26 या चालू वर्षातील
https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवरील सद्यस्थिती
| भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
(ऑनलाईन पोर्टलवरची सद्यस्थिती) |
आर्थिक वर्ष
सन – 2025-26 |
|
| Total Application – 856 | Under Scrutiny – 616 | Approved – 157 |
| Rejected – 06 | Admitted – 0 | Renewals – 456 |
| Sent Back – 77 | ||