
उद्दिष्ट :
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे.
- विद्यार्थ्यांचा गळतीचा प्रमाण कमी व्हावे.
- विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
अटी व शर्ती :
- विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गांतील असावा.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी शाळांतील परीक्षेत व स्पर्धेत शिक्षण घेत असलेला असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनुसूच आहे.
लाभाचे स्वरूप :
-
- १) अभ्यासक्रमाचे गट निहाय विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिनांकापासून परीक्षेच्या कालावधीपर्यंत (कमाल १० महिने) निर्वाह भत्ता प्रदान केला जातो.
-
- २) डे-स्कॉलर विद्यार्थ्यांना रु. २५० ते रु. ७०० प्रती माह या दराने निर्वाह भत्ता प्रदान केला जातो.
-
- ३) वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. ४०० ते रु. १३५० दराने निर्वाह भत्ता प्रदान केला जातो.
- ४) निर्वाह भत्ता व्यतिरिक्त महाविद्यालयीन शुल्क (शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर शुल्क) या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
योजनेची प्रगती:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परीपत्रक क्र. ईबीसी-२०१८/प्र.क्र.४८४/शिक्षण-१ दिनांक ०८ जानेवारी २०१९ नुसार सन २०१८-१९ पासुन महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणा-या अनुसूचीत जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती ई. योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचीत जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, व्यावसायीक पाठयक्रमात शिकणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना आणि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनाअंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंद केलेल्या अर्जांबाबत सर्व संबंधीत सक्षम प्राधीकारी यांची जबाबदारी निश्चीत करण्यात आलेली आहे. सदरहु शासन परिपत्रकातील मुद्या क्र. १० नुसार आयुक्त, समाज कल्याण पुणे यांना अनुसूचीत जाती प्रवर्गाच्या योजनांच्या अनुषंगाने महाडीबीटी प्रणाली अंतर्गत तांत्रीकदृष्टया केंद्रीभुत आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आलेले असले तरी अनुसूचीत जातीच्या पात्र विद्यार्थ्यांना अदा करण्यात येणा-या लाभाच्या रकमेच्या वितरण कार्यपदधती संदर्भातील बदल वगळता उर्वरीत योजनांच्या प्रचलीत शासन निर्णयान्वये निर्धारीत केलेली अंमलबजावणीची कार्यपदधती कायम आहे. त्यामुळे महाडीबीटी प्रणालीवरील योजनांच्या अटी व शर्तीनुसार प्रत्यक्षातील अंमलबजावणी, प्राप्त होणा-या अर्जाची पात्रतेची तपासणी, नियमानुसार मंजुरीबाबत संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे अंतिमत: जबाबदार राहतील असे नमुद आहे.
सदरहू शाासन निर्णयातील वरीप्रमाणे नमुद तरतुदींनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नागपूर, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअतंर्गत मॅट्रीकोत्तर अभ्यासक्रमास प्रवेशित अनुसुचीत जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, व्यावसायीक पाठयक्रमात शिकणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना आणि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनाअंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंद केलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मंजुर केले जातात. सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडुन मंजुर केलेल्या अर्जांची देयके मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (अनुसूचीत जाती प्रवर्गाकरीता) या कार्यालयाकडुन तयार करण्यात येतात व PFMS प्रणाली व्दारे शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यात दोन हप्त्यांमध्ये (Installments) अदा करण्यात येते.
ऑनलाईन लिंक :
https://mahadbtmahait.gov.in
माहिती :
| अनु क्र. | शैक्षणिक वर्ष | प्राप्त अर्ज संख्या | मंजुर अर्ज संख्या |
|---|---|---|---|
| १ | २०२४-२५ | ३५५८५ | ३५३९० |
| २ | २०२३-२४ | ४१०१४ | ३८९८० |
| ३ | २०२२-२३ | ४५०६८ | ४३६६३ |
| ४ | २०२१-२२ | ४३९०० | ४२५६३ |