मागासवर्गीय मुला-मुलींकरीता शासकिय वसतिगृहे

शासन निर्णय :-

  1. शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य ,क्रिडा व पर्यटन विभाग- क्रमांक:

    बीसीएच- 1082 /90385/(38) बी.सी.डब्ल्यू-4 दिनांक 16 मे 1984

  1. शासन निर्णय, सामाजिक न्याय व ‍विशेष सहाय्य विभाग क्रमांक-बी.सी.एच.2010/प्र.क्र.430/

    मावक-4 दिनांक 26 जुलै 2011

  1. शासन निर्णय, सामाजिक न्याय व ‍विशेष सहाय्य विभाग क्रमांक-बी.सी.एच.2025/प्र.क्र.13/

    शिक्षण- 2 दिनांक 10 मार्च 2025

    1. शासन निर्णय, सामाजिक न्याय व ‍विशेष सहाय्य विभाग क्रमांक-बी.सी.एच.2024/प्र.क्र.90/

    शिक्षण- 2 दिनांक 26 सप्टेंबर 2025

    1. योजनेचा उद्देश व योजने इतर माहीती : मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतीगृहे सुरु करण्यात आली.
    1. योजनेत देण्यात येणारे लाभ :- मोफत निवास व भोजन, अंथरुन,ग्रंथालयीन सुविधा, शालेय /महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश, क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अॅप्रॉन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कला निकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्त्ता.
    1. योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष :-
    • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रहिवासी असावा.
    • विद्यार्थी अनुसुचित जाती/जमाती,विमुक्त जाती व भटक्या निमभटक्या जमातीपैकी व आर्थीकदृष्टया मागासवर्गीय , ‍विशेष मागासवर्गीय असावा.
    • गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
    • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाखापेक्षा जास्त नसावे.
    • इयत्ता ८ वी ते पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येतो.
  1. आवश्यक कागदपत्रे :-
    • सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिवास प्रमाणपत्र
    • सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र
    • गुणपत्रिका
    • सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला
    • शाळा सोडल्याचा दाखला
    • बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती
    • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
    • आधार कार्डची प्रत
    • निरोगी असल्याबाबत शासकिय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
  1. सन 2025-26 या चालू वर्षातील योजनेची (शासकीय वसतिगृह प्रवेश ) सद्यस्थीती-
अ.क्र वसतीगृहाचे नांव मान्य संख्या प्रवेशित संख्या रीक्त जागा
1 डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सेवाग्राम रोड वर्धा 75 75 0
2  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी मेघे ,वर्धा 100 100 0
3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगणघाट, वर्धा 100 100 0
4 डॉ.बाबासाहेब आंबेडकर   मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आर्वी, वर्धा 75 75 0
5 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह देवळी, वर्धा 100 97 3
6 डॉ.बाबासाहेब आंबेडकर   मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह पुलगाव  वर्धा 100 96 4
7 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महादेवपुरा  जि.वर्धा 75 75 0
8 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नालवाडी वर्धा 100 100 0
9 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पुलगाव  जि.वर्धा 100 100 0
10 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आष्टी जि.वर्धा 100 77 23
  एकुण 925 895 30

 

  1. सन 2022-23, 2023-24, 2024-25 या मागील तीन वर्षाची स्थीती.

 

अ.क्र वसतीगृहाचे नांव मान्य संख्या प्रवेशित संख्या-2022-23 प्रवेशित संख्या-2023-24 प्रवेशित संख्या-2024-25
1 डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सेवाग्राम रोड वर्धा 75 75 75 75
2  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी मेघे ,वर्धा 100 100 100 100
3 डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगणघाट, वर्धा 100 60 75 75
4 डॉ.बाबासाहेब आंबेडकर   मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आर्वी, वर्धा 75 75 75 75
5 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह देवळी, वर्धा 100 100 100 100
6 डॉ.बाबासाहेब आंबेडकर   मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह पुलगाव  वर्धा 100 75 69 75
7 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महादेवपुरा  जि.वर्धा 75 75 75 75
8 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नालवाडी वर्धा 100 100 100 100
9 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पुलगाव  जि.वर्धा 100 74 74 75
10 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आष्टी जि.वर्धा 100 75 75 100
  एकुण 925 809 818 850

 

टिप :- सन 2024-25 पर्यंत वर्धा जिल्हयातील शासकिय वसतिगृहांची एकूण मान्य संख्या 850 इतकी होती.  सन 2025-26 मध्ये तीन वसतिगृहांच्या मान्य संख्येत वाढ करण्यात आली असून प्रत्येकी 25 इतकी अशी एकूण 75  इतकी वाढ करण्यात आल्याने 2025-26 पासून सदर वसतिगृहांची एकूण मान्य संख्या 925 इतकी करण्यात आली आहे.