
अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती देण्यात येते .
पात्रतेचे निकष /अटी शर्ती:
- विद्यार्थ्यी अनुसूचित जाती/ नवबौध्द घटकातील असावा.
- विद्यार्थ्यी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- शासन निर्णय दि.30.10.2023 अन्वये विद्यार्थ्याचे कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
- पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहीती करीता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in सकेंत स्थळावर प्रत्येक वर्षी विस्तृत जाहीरात प्रसिध्द करण्यात येते .