शासन निर्णय :-
- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग- शासन निर्णय, क्रमांक:
अजाशा-2005/प्र.क्र.432/मावक-4 दिनांक 01 जून 2006
- शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग- क्रमांक:
बीसीएच-2011/ प्र.क्र.211/मावक-4 दिनांक 29 जून 2011
1.योजनेचा उद्देश व योजने इतर माहीती: आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जातीच्या व नवबौध्द मुलांमुलींना – प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही. अशा मुलांमुलींच्या-शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरु करण्यात आल्या आहे.
2.योजनेत देण्यात येणारे लाभ :– मोफत निवास व भोजन, अंथरुन, ग्रंथालयीन सुविधा, शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश, क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी शैक्षणिक सुविधा.
3.योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष :-
-
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी अनुसुचित जाती/जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमातीपैकी व आर्थीकदृष्टया मागासवर्गीय असावा.
- गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाखापेक्षा जास्त नसावे.
- इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या अनुसूचित जातीच्या व नवबौध्द मुलांमुलींना प्रवेशासाठी अर्ज करता येतो.
4.आवश्यक कागदपत्रे :-
-
- सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिवास प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्डची प्रत
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
- निरोगी असल्याबाबत शासकिय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
5.सन 2025-26 या चालू वर्षातील योजनेची (शासकीय निवासी शाळा प्रवेश ) सद्यस्थीती-
| अ.क्र. | अनुसुचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकिय निवासी शाळेचे नाव | मान्य संख्या | इमारत क्षमता | प्रवेशित विद्यार्थी संख्या 2025-26 |
| 1 | अनु.जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,उमरी/मेघे, वर्धा | 200 | 200 | 183 |
| 2 | अनु.जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,हैबतपुर,ता.आर्वी | 200 | 200 | 173 |
| एकूण | 400 | 400 | 356 |
6.सन 2022-23, 2023-24, 2024-25 या मागील तीन वर्षाची स्थीती.
| अ.क्र. | अनुसुचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकिय निवासी शाळेचे नाव | मान्य संख्या | इमारत क्षमता | प्रवेशित विद्यार्थी संख्या 2022-23 | प्रवेशित विद्यार्थी संख्या 2023-24 | प्रवेशित विद्यार्थी संख्या 2024-25 |
| 1 | अनु.जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,उमरी/मेघे, वर्धा | 200 | 200 | 182 | 172 | 175 |
| 2 | अनु.जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,हैबतपुर,ता.आर्वी | 200 | 200 | 172 | 163 | 155 |
| एकूण | 400 | 400 | 354 | 335 | 330 |