प्रस्तावना :
भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट अघोरी अमानुष संस्कारातून रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत असल्याचे दिसून येते. लाखो माणसांचे जीव वाचविण्यासाठी त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी शासनाने दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०२३ जारी करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सदर कायद्याची परिणामकारक व योग्य वजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त (महसूल) यांच्या अध्यक्ष्यतेखाली जिल्हास्तरावरील जादूटोना विरीधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (Distric Programme Implimentation & Monitoring Committee) Dist. PIMC.दि. २० जुन २०२२ च्या शासन निर्णयानुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर जादूटोना विरोधी कायद जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आलेली असून यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन संस्थे मार्फत २ अशासकीय सदस्य व जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात येते.
योजनेचा उद्देश :
गाव खेड्यातील जंगली भागात मागासलेल्या लोकांची वस्ती आहे त्यांना राहायला घरे नाहीत ते झाडाखाली राहतात त्यांना शिक्षण नाही, शिकार करतात. अशा लोकांपर्यंत जावून अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे प्रतिनिधी असलेल्या सदस्यांमार्फत लोकांपर्यंत जावून जनजागृती कार्यक्रम घेणे जेणे करून जादूटोण कार्यक्रम अंतर्गत लोकांना जागृत करता येईल.