प्रस्तावना –
बदलत्या सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. वृद्धापकाळात त्यांना आधाराची, त्यांना समजून घेण्याची गरज असते. मात्र, अनेक घरांमध्ये वृद्धांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. ते दुर्लक्षित ठरतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. घरातील वातावरण गढूळ होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपले उर्वरित आयुष्य घालविणे कठीण होऊन बसते. अशा वेळी आपल्या व्यथा मांडून समस्यांचे निराकरण करणारे हक्काचे एखादे व्यासपीठ असावे, या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत जेष्ठ नागरिक योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश –
1.जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे.
2.गरज पडल्यास त्यांचे कौन्सिलिंग करणे.