उद्दिष्ट :
इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र) मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली.
अटी व शर्ती :
- उत्पन्न व गुणांची अट नाही.
- विद्यार्थिनीकडे स्वतःचे नावाचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक.
शिष्यवृत्तीचे स्वरूप :
- ५ वी ते ७ वी करितारु. ६०/- दरमहा(१० महिने)
- ८ वी ते १० वी करितारु १००/- दरमहा(१० महिने)
संपर्क :
- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक
- जिल्हा समाज कल्याण अधिकारी