वर्धा जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वृद्ध आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे जीवनमान उंचावून, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि एक न्याय्य, समतावादी व सन्मानजनक समाज निर्माण करणे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीयांसाठी विशेषत: अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व सर्व व्यक्तींचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावुन त्यांची विकासात्मक प्रगती होण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. गरीब, शोषित व पिडीत व्यक्तींना या सर्व योजनांचे लाभ मिळवुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटीबध्द असुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग अग्रेसर आहेत.
या कार्यालयामार्फत मागासवर्गीय मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह व निवासी शाळा, सफाई कामगारांच्या मुला/मुलींसाठी निवासी शाळ...
महिला आश्रम जवळ, लक्ष्मीनगर, सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड, वर्धा – ४४२००१
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुलींना विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय वसतिगृहे विभागामार्फत चालवले जातात.
अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही अशा मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा विभागामार्फत चालविली जाते.
मा.मंत्री.सामाजिक न्याय विभाग
आयुक्त समाज कल्याण,दिव्यांग कल्याण महाराष्ट्र, संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, महासंचालक, डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व सामाजिक न्याय विभागातील विविध महामंडळे यांचे मार्फत सर्व योजना तळागळातील गटसमूहापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’या पुस्तीकेचा निश्चित मोलाचा सहभाग राहणार आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांव्दारे जनतेत जनजागृती व प्रबोधन करुन जातीभेद निर्मुलन, सामाजिक न्याय, समता, सांप्रदायिक सद्भावना व सहिष्णुता, अंधश्रध्दा निर्मुलन, वैज्ञानिक जाणीव, जागृती, बंधुत्व व मानवता इत्यादी तत्वे समाजात रुजविण्यात व समाजामध्ये सामाजिक न्यायाचा संदेश पोहचविण्यात राज्य शासन मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहे. या सर्वयोजनांची तपशीलवार माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा ‘व्हीजन डॉक्युमेंट’ या माहिती पुस्तिकेचा मुळ उद्देश आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांचे बदललेले स्वरुप व काही नवीन योजना यांचा समावेशही या आवृत्तीत करण्यात आला आहे. अशा विविध कल्याणकारी योजनांची अद्ययावत माहिती समाजातील मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकास प्रक्रियेत ही माहिती पुस्तीका मोलाची भुमिका बजावेल अशी माझी खात्री आहे.
शुभेच्छांसह….!
मा.मंत्री.सामाजिक न्याय विभाग
सामाजिक न्याय हि एक विस्तृत संकल्पना आहे. मानवी समाजातील लोकांचे परस्पर संबंध हे हितकारक आणि प्रगतिला पुरक असावेत. यासाठी लोकशाही राज्यव्यवस्थेत नागरीकांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, त्यांचे हक्क, कर्तव्ये, जबाबदाऱ्या हे घटक अत्यंत महत्वाचे असुन यासाठी सामाजिक न्यायावर आधारलेली सामाजिक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असते. यासाठी समाजातील दुर्बल घटकांसोबत घेउन त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी शासन व्यवस्था नेहमी कट्टीबध्द असते.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना मध्ये आमुलाग्र बदल घडवुन आणण्यासाठी नेहमी पुढील अनेक वर्षाची दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेवुन ‘व्हिजन डॉक्युमेंट’तयार करणेही बाब विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.
यासाठी सदर विभागाची योजना निहाय लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीकोणातुन विचार करुन सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन तयार करण्यात येणारी आगामी 25 वर्षाचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने करण्यात येणारे ‘व्हिजन डॉक्युमेंट’हा अनोखा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. डोळ्यासमोर व्हिजन असेल तर अपेक्षित ध्येय, उद्दिष्ट प्राप्त होते.
सदर उपक्रमासाठी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या पुस्तिकेसाठी मनस्वी शुभेच्छा..
मा.आयुक्त, समाज कल्याण, पुणे
समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने, समान संधीसह आणि स्वाभिमानाने जगता यावे, या ध्येयाने समाज कल्याण विभाग सातत्याने कार्यरत आहे. या दिशेने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व सेवांमुळे अनेक गरजू नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
शिक्षण, सामाजिक सुरक्षितता व सर्वसमावेशक विकास यांवर विशेष भर देत समाज कल्याण विभागाने समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. या प्रयत्नांमुळे सामाजिक समता व न्यायाची संकल्पना अधिक दृढ होत असून सक्षम व आत्मनिर्भर समाजनिर्मितीला चालना मिळत आहे.
या उल्लेखनीय कार्यासाठी समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असून, भविष्यातही लोकहिताचे असेच प्रेरणादायी कार्य सुरू राहो, अशा हार्दिक शुभेच्छा देते.
मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा
समाजातील दुर्बल, वंचित व मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले वर्धा समाज कल्याण कार्यालय समाजात सामाजिक समता, न्याय व बंधुता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, जेष्ठ नागरिकांचे सशक्तीकरण, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत आहे.
या स्तुत्य उपक्रमांसाठी वर्धा समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. समाजाच्या उन्नतीसाठी आपले कार्य असेच अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा.
मा.प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भंडारा जिल्ह्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध, दिव्यांग दुर्बल घटक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांगीन विकासाच्या हेतू पूर्तीसाठी विविध योजनाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी हि माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.
सदर पुस्तिका जिल्ह्यातील नागरिकास उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे. या विभागातर्फे अनेक नवीन योजना सुरु करण्यास आल्या असून पूर्वी पासून राबविण्यात येणाऱ्या योजनामध्ये बदलत्या परिस्थितीनुरूप, स्थितीनुसार आमुलाग्र बदल करण्यात आलेला आहे. या सर्व योजनाची माहिती, कार्यवाही, तपशिल, तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्यासाठी हि माहिती पुस्तिका हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे.
“दृष्टीक्षेप-2045” प्रकाशनाकरिता हार्दिक शुभेच्छा!
मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा
समताधिष्ठित व समावेशक समाज घडविणे हे समाज कल्याणाचे अंतिम ध्येय आहे. वर्धा समाज कल्याण कार्यालय या ध्येयाकडे दूरदृष्टी, संवेदनशीलता आणि जबाबदारीने वाटचाल करत आहे. शिक्षण, निवास, सामाजिक सुरक्षा व सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्याचे कार्य उल्लेखनीय आहे.
विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी घटकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे केवळ सुविधा नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहेत. या स्तुत्य कार्यासाठी समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
हे कार्य अधिक व्यापक स्वरूप धारण करीत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरो, हीच हार्दिक शुभेच्छा.